150+ नवरीसाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane For Bride

Marathi Ukhane: तुम्ही मराठी उखाणे शोधत आहात का? येथे सुंदर छान छान लग्नातील उखाणे कॉमेडी नवरदेवासाठी आणलं आहो. तुम्ही या सर्व लग्नातील उखाणे विनामूल्य डाउनलोड करू शकता आणि नवरीसाठी शेअर करू शकता.

Romantic Marathi ukhane for female / Navriche ukhane

गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सून,
….रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र.

चांदीची जोडवी, लग्नाची खूण
….रावांचे नाव घेते ची सून.

शुभ मंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
….राव आहेत माझे जिवन साथी.

एक तीळ सात जण खाई,
….ना जन्म देणारी धन्य ती आई.

सासुबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
….रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

ऊखाणा सांगते मी खुपच ईझी,
….माझे राव राहतात नेहमीच बीझी.

मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण,
….रावांचे नाव घेते ची मी सून

आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,
….रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश.

एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,
अशीच राहु दे माझी व …..रावांची प्रेम ज्योती

marathi ukhane for bride

मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला,
…..रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

जीवनात ही घडी अशीच राहू दे
….ची प्रीत सदैव अशीच फुलू दे.

नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती,
संसार होईल मस्त
….राव असता सोबती.

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
….रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,
….रावांच्या जीवनात टाकते मी पाहिले पाऊल.

निळ्या नभात चंद्राचा प्रकाश,
.…रावांवर आहे माझा विश्वास.

गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
….रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

मराठी उखाणे नवरी साठी

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
….रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
….रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.

हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
….रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.

अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
….ला घास घालतो वरण-भात तूपाचा.

दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग,
सुखी आहे संसारात सौ…..च्या संग.

उन्हाळ्या चे दिवस आले झाली लग्ने सुरु,
….रावांचे नाव घेऊन केला आमचा संसार सुरु.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
….रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.

चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,
….रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.

Marathi Ukhane for Marriage

केळीच्या पानावर गाईचं तूप,
….रावांचं कृष्णासारखं रुप.

चांदीच्या ताटात हळदी कुंकवाचा काला,
….रावांच नाव घ्यायला आजच प्रारंभ केला.

कुरुंदाची सहन चंदनाचे खोड,
….रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.

जशी आकाशात चंद्राची कोर,
….हे पती मिळायला माझे नशीब थोर.

शंकराचा सोमवार, गणपतीची चतुर्थी,
माझ्या ह्रुदयांत कोरली,
….रावांची सुंदर मूर्ती.

नव्या नव्या संसाराचा, नाजूक-गोड अनुभवही नवा,
….राव व माझ्या संसाराला, तुमचा अखंड आशीर्वाद हवा.

दुधाचा केला चहा चहाबरोबर होती खारी,
….राव हे जगात लयभारी.

जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज,
….चं नाव घेऊन गृहप्रवेश करते आज.

Ukhane in Marathi for Male

कामाची सुरुवात होते श्रीगणेशापासून,
….रावांचे नाव घ्याला सुरुवात केली आजपासून.

तुळशी माते तुळशी माते वंदन करते तुला,
….रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती राहू दे मला.

माहेरी साठवले मायेचे मोती,
.…रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती.

लावीत होते कुंकू त्यात पडले मोती,
….रावांसारखे मिळाले पती भाग्य मानू किती.

जंगलात जंगल ताडोबाचं जंगल,
….रावांच्या संसारात सर्व राहो कुशल-मंगल.

नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी,
.…माझा राजा आणि मी त्यांची राणी.

नवे घर ,नवे लोक, नवी नवी नाती
संसार होईल मस्त,
….राव असता सोबती.

आईचे वळण, वडिलांचे शिक्षण,
.…राव पती मिळाले हेच माझे भूषण.

सद्गुणी माझे सासू-सासरे, प्रेमळ माझे माता-पिता,
….चं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.

Modern Marathi Ukhane for Female

प्रेमरूपी संसार, संसार रूपी सरिता,
….चं नाव घेते खास तुमच्याकरिता.

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
….रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.

मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध,
….सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद.

स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून,
….रावांचे नाव घेते त्यांच्याच बाजूला बसून.

फुलाचा सुगंध मातीसही लागे,
….रावांशी जुळले जन्मोजन्मीचे धागे.

मोह नसावा पैश्याचा गर्व नसावा रूपाचा,
.…बरोबर संसार करीन सुखाचा.

श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष,
.…रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.

नाही मी अप्सरा सुंदर तरीही मला निवडले,
.…रावांचे हेच रुप मला फार आवडले.

नट्टा-पट्टा करून छान मी सजते,
.…रावांचे नाव घ्यायला भारी लाज वाटते.

मंदिरात वाहाते फुल आणि पान,
….रावांचे नांव घेते ठेऊन सर्वांचा मान.

मराठी उखाणे नवरदेवासाठी

आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
….चं नाव घेते कुंकू लावून.

अनेकांनी लिहीली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते युवती आज झाले …. ची सौभाग्यवती.

सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले,
.…चे नाव घ्यायला सर्वांनी अडवले.

माहेरचे निरांजन सासरची वात,
.…चे नाव घेऊन करते संसाराला सुरूवात.

आई-वडिल आहेत प्रेमळ, सासू सासरे आहेत हौशी,
….चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड,
….चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

यमुना काठी वाजवतो कृष्ण बासरी,
….रावांसोबत आले मी सासरी.

आईने केली माया बाबांमुळे बनले सक्षम,
….रावांसोबत होईल माझा संसार भक्कम.

मंगळसुत्रात शोभून दिसतात काळे मनी,
….राव माझ्या सौभाग्याचे धनी.

तुळशीचे वृंदावन आहे पावित्र्याचे स्थान,
….रावांनी दिला मला सुवासिनीचा मान.

इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून,
….रावांचं नाव घेते ची सून.