मराठी सुविचार: तुम्ही मराठी सुविचार शोधत आहात का? कधीकधी एखाद्याचा दिवस लगेच बदलण्यासाठी काही सकारात्मक कोट्स किंवा प्रोत्साहनाचे शब्द लागतात. तुमचा आजीवन जिवलग मित्र असो किंवा तुम्ही रस्त्यावरून जाताना एखादा अनोळखी व्यक्ती असो, सकारात्मक संदेश देण्यासाठी थोडा वेळ दिल्याने दोन्ही व्यक्तींच्या कल्याणावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो.
Marathi Suvichar

अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढच की,
अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि
समाधान माणसाला सुखात ठेवते .

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात,
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि
दुसरी भेटलेली माणसं.

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते,
म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा
आयुष्य आनंदात जाईल .

जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,
तेव्हा रस्ता बदला, “सिद्धांत” नाही,
कारण झाड नेहमी ‘पान’ बदलतात ‘मूळ्या’ नाही.

प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण,
माणसे तुम्हाला काय बोलतात
यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही.
Success Marathi Suvichar

चालताना एक पाय पुढे असतो,
एक पाय मागे असतो,
पुढच्याला त्याचा गर्व नसतो,
मागच्याला पुढच्याला हेवा नसतो,
कारण क्षणभरातच स्तिथी बदलणार असते.
हे पायांना कडू शकतं,
पण माणसाला का कळत नसतं.

जगातलं सर्वात चांगलं नातं तेच असतं,
जिथे एक स्मित हास्य आणि
एक छोटी क्षमा यामुळे जीवन पूर्वीसारखं होईल.

खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल पण,
खोट बोलून कोणाला सुख देऊ नका.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत.
Life Marathi Suvichar

जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरीही घाबरू नका,
कारण त्या शुन्या समोर कितीही आकडे
लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे.
पण जर मन शून्यात गेले तर मात्र
जीवन संपायला वेळ लागत नाही.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा,
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

मन शांत ठेवायला आणि उत्तराची प्रतिक्षा करायला शिकलात तर
बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे तुमचे मनच तुम्हाला देते.

जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा,
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि
जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा,
चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.
Inspirational Marathi Suvichar
जगातील प्रत्येकाकडे 24 तास असतात,
ज्याला यशस्वी व्हायचे आहे
ते योग्यरित्या वापरण्यास शिकतात.
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
विश्वास हा किती छोटा शब्द आहे,
वाचायला सेकंद लागतो,
विचार करायला मिनीट लागतो,
समजायला दिवस लागतो,आणि
सिध्द करायला संपूर्ण आयुष्यचं लागतो.
जगा इतके की आयुष्य कमी पडेल,
हसा इतके की आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा की,
परमेश्वराला देणे भाग पडले पाहिजे.
आयुष्य म्हणजे चहा बनवण्यासारखे आहे.
अहंकाराला उकळू द्या,
चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या,
दु:खांना विरघळून जाऊ द्या,
चुकांना गाळून घ्या आणि
सुखाचा आनंद हसत हसत घ्या.
अंदाज चुकीचा असू शकतो
परंतु अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही,कारण
अंदाजी आपल्या मनाची कल्पना आहे,आणि
अनुभव हे आपल्या जीवनातील शिक्षण आहे.
Marathi Suvichar Status
आयुष्यातील अनेक समस्यांची,
फक्त दोनच कारणं असू शकतात
पहिले म्हणजे आपण विचार न करता कृती करतो,
आणि कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो
तेव्हा आपण आरशाला तोडत नाही,
त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे,
आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी
आपल्यातील अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे.
“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे.
विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते.
माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
जिथे मी जास्त मागत नाही व
देव मला कधीच कमी पडू देत नाही.
आशा सोडायची नसते,
निराश कधी व्हायचं नसतं,
अमृत मिळत नाही,
म्हणून विष कधी प्यायचं नसतं.
Positive Success Marathi Suvichar
जगातील सर्वात सुदंर जोडी
तुम्हाला माहिती आहे का अश्रू आणि हास्य
कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही
पण ते जेव्हा दिसतात
तो आयुषातला अत्यंत सूंदर क्षण असतो.
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल
पण ती स्वतःची असली पाहिजे.
क्षमा म्हणजे काय ?
सुंदर उत्तर-
चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे क्षमा.
हसता हसता सामोरे जा “आयुष्याला”
तरच घडवू शकाल “भविष्याला”
कधी निघून जाईल “आयुष्य” कळणार नाही,
आताचा “हसरा क्षण” परत मिळणार नाही.
फुल बनून हसत राहणे,
हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे,
हेच जीवन आहे.
भेटून तर,
सर्वजण आंनदी होतात
पण न भेटता नाती जपणं,
हेच खर जीवन आहे.
ध्येय” दुर आहे म्हणून रस्ता “सोडू नका”
स्वप्नं मनात धरलेलं कधीच “मोडू नका”
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत “हार मानू नका”.
जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बँलन्स
पुरेसा असेल तर,
सुखाचा चेक कधीच
बाउंस होणार नाही.
सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाची ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.
मन किती मोठं आहे हे महत्वाच नाही,
मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाच आहे.
मी माझ्या जीवनात प्रत्येकाचे मन जिंकले पण
माझे मन मात्र कुणालाच जपता आले नाही.
चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून
उदास राहण्यापेक्षा,
अनोळखी लोकात राहून आनंदी
राहिलेलं कधीही चांगल.
Marathi Suvichar Short
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक
असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल,
मनं शांत ठेवुन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल.
आपलं आयुष्य इतकं छान,
सुंदर आणि आनंदी बनवा
की निराश झालेल्या व्यक्तीला,
तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे.
प्रभाव चांगला असण्यापेक्षा
स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे.
जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे “सल्ला”
एकाकडे मागा ,
हजार जण देतील आणि
जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे “मदत”
हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच करेल.
माणुस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो,
मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.
इतिहास सांगतो काल सुखी होतो,
भविष्य सांगते उद्या सुखी असाल पण आपले मन
आणि विचार चांगले असेल तर रोजच सुख आहे.
आयुष्य सरळ आणि साधं आहे,
ओझं आहे ते फक्त अपेक्षांचं.
मराठी सुविचार संग्रह
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात,
फरक एवढाच आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.
सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो.
खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही.
“नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती
व मौल्यवान आहे,
तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.
धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
Read Also: