Shivaji Maharaj Quotes in Marathi: शिवाजी महाराज हे एक महान शासक होते ज्यांनी 1674 ते 1680 पर्यंत राज्य केले. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाते. त्याच्या कारकिर्दीत भारतातील मराठा साम्राज्याची सुरुवात झाली. त्यांचा जन्म १६२७ मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि १६८० मध्ये रायगड किल्ल्यावर मृत्यू झाला.
Shivaji Maharaj Quotes in Marathi

भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे,
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे.
जय शिवाजी

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.

सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय

शूरता हा माझा आत्मा आहे,
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,
होय मी मराठी आहे.
जय शिवराय

जन्म दिला जिने,
तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु,
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु.
Shivaji Maharaj Caption in Marathi For Instagram

शब्द पडतील अपुरे,
अशी शिवबांची कीर्ती,
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही,
हा जन्म काय, हजार जन्म झाले,
तरी नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.
जय भवानी जय शिवाजी

अंगात हवी रग,
रक्तात हवि धग,
छाती आपोआप फुगते,
एकदा जय शिवराय बोलून बघ.

गर्व आहे शेंदूर गुलालाचा,
गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा,
गर्व आहे विठोबा-माऊलीचा,
अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या.

इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती.
Shivaji Maharaj Motivational Quotes Marathi

वाघाची जात कधी थकणार नाही,
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,
शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत
जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही.
जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती,
अरे मरणाची कुणाला भीती,
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती.
शिवबा शिवाय किंमत नाय,
शंभू शिवाय हिंमत नाय,
भगव्या शिवाय जमत नाय,
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय.
जय जिजाऊ जय शिवराय दैवत छत्रपती
भवानी मातेचा लेक तो,
मराठ्यांचा राजा होता,
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा तो बाप होता.
जय भवानी जय शिवाजी
यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे.
जय जिजाऊ जय शिवराय
शिवाजी महाराज सुविचार
माहीत नाही काय जादू असते,
शिवाजी महराज्यांच्या चरणात
आशिर्वाद घ्यायला जितका खाली
वाकतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते.
आयुष्य छान आहे,
थोड लहान आहे परंतु,
छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर
जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे.
जागवल्याशिवाय जाग येत नाही,
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,
”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही.
कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास
जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल
तर तो मी बनवेन.
झेंडा स्वराज्याचा,
झेंडा शिवराज्याचा,
गर्जा महाराष्ट्र माझा.
जय शिवराय
एक विचार समतेचा, एक विचार नितीचा,
ना धर्माचा, ना जातीचा,
माझा राजा फक्त मातीचा.
जय शिवराय
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय
कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायाचे,
म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायाचे.
जय शिवप्रभूराजे
एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही,
आमच्या राजाची शिकवण आहे,
अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.
ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा
डोंगरही मातीचा गोळा वाटतो.
गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,
शिवरायांचा शिव:भक्त म्हणुन
जगायचा सन्मान मिळतोय,
कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान जगात कोणतच नाही.
जय जिजाऊ जय शिवराय
तुझी किर्ती अशीच आसमानामंदी राहू दे,
तुझ्या संस्कारात साऱ्या पिढ्या घडू दे.
जय शिवराय
Shivaji Maharaj Thoughts Marathi
ना शिवशंकर, तो कैलाशपती,
ना लंबोदर, तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो
राजा शिवछत्रपती.
महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण “शिवनेरी”
महाराजांचा मृत्यू झाला ते ठिकाण “रायगड”
किती अजब आहे ना दोन्ही शब्दातील पहिली
दोन अक्षरं मिळून एक महान व्यक्तीचं नाव
तयार होतं ते म्हणजे छत्रपती “शिवराय”.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
पुन्हा सुदूर पसरवू, महाराष्ट्राची कीर्ति
शिवरायांची स्मरुन मुर्ती, शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती
एकच ध्यास, जपू महाराष्ट्राची संस्कृती.
आई ने चालायला शिकवले,
वडिलांनी बोलायला शिकवले,
आणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले.
बहिणीची इज्जत करा
काय फरक पडतो ती
आपली आहे की इतरांची
हीच आपल्या महाराजांची शिकवण आहे.
जय जिजाऊ जय शिवराय
Read Also: